शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017 (10:36 IST)

‘पद्मावती’मधील ‘घुमर’गाणं रिलीज

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनच्या बहुप्रतीक्षित ‘पद्मावती’ चित्रपटातलं ‘घुमर’ हे पहिलं गाणं रिलीज झालं आहे. राजपुत समाजातील घुमर या पारंपरिक नृत्यशैलीवर आधारित या गाण्यात दीपिकाचा अनोखा अंदाज पहायला मिळत आहे. घुमना या हिंदी शब्दावर ‘घुमर’ हा नृत्यप्रकार आधारित आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी घुमर गाणं संगीतबद्ध केलं असून सुरेल गायिका श्रेया घोषालच्या आवाजात हे गाणं ऐकायला मिळणार आहे.
 
घुमर नृत्यात पारंगत कोरिओग्राफर ज्योती तोमर यांनी गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे. ज्योती तोमर या घुमरचं प्रमाणित प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था चालवतात. राजस्थानमधील किशनगडच्या दिवंगत राजमाता गेवर्दन कुमारीजी यांनी ही संस्था स्थापन केली होती. हे सर्वात कठीण गाणं होतं. सिनेमाचं शूटिंग याच गाण्यापासून सुरु झालं. मी तो दिवस कधीच विसरु शकणार नाही. मला असं वाटलं की पद्मावतीच माझ्या अंगात संचारली आहे.’ असे दीपिकाने मीडियाशी बोलताना सांगितले.