Ileana Dcruz: अभिनेत्री इलियाना डिक्रूझ आई बनली, मुलाला जन्म दिला
अलीकडेच इलियानाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की त्यांच्या घरी मुलगा झाला आहे. इलियाना ने आपल्या मुलाचा फोटो दाखवला असून त्यांनी बाळाचे नाव देखील संगितले आहे. इलियानाने मुलाचे नाव कोआ फिनिक्स डोलन ठेवले आहे. सोशल मीडियावर चाहते अभिनेत्रीचे खूप अभिनंदन करत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील अभिनेत्रीला आई झाल्याबद्दल शुभेच्छा देत आहेत. इलियानाने मुलाचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी मुलाची जन्मतारीखही दिली आहे. इलियानाने सांगितले की, तिने 1 ऑगस्ट 2023 रोजी एका मुलाला जन्म दिला.
इलियाना ने कॅप्शन मध्ये लिहिले आहे, 'आमच्या मुलाचे या जगात स्वागत करताना किती आनंद होत आहे हे शब्दात व्यक्त करता येणार नाही. आमचे हृदय भरले आहे.' अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट्स वाढत आहेत. काही मिनिटांतच हजारो लोकांनी इलियानाचे अभिनंदन केले. एका यूजरने म्हटले की, 'इलियानाच्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'आई होण्याचे भाग्य सर्वांनाच मिळत नाही. इलियाना तुझे खूप खूप अभिनंदन.
Edited by - Priya Dixit