रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (18:14 IST)

प्रसिद्ध अभिनेत्रींच्या आईवर आली भीक मागण्याची वेळ, लेकींनी ओळख दाखवली नाही

rape
आई वडील असे दैवत आहे की जे कधीही मिळणार नाही. आई वडिलांसारखे दैवत गमावल्यावर पुन्हा मिळणार नाही. आई वडील आपल्या मुलांसाठी काहीही करतात. पण काही मुलं आपल्या आई वडिलांसाठी काहीही करत नाही. त्यांना अडचण समजून त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओ मध्ये एक 90 वृद्ध महिला एका मंदिराच्या पायऱ्यांवर बसून भीक मागत आहे. या महिलेचे नाव पौर्णिमा देवी असून त्या एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची आई आहे.

या अभिनेत्रीने सपने सुहाने लडकपनचे या मालिकेत काम केलं आहे. या महिलेचा जावई देखील एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहे. तसेच या महिलेची नातं देखील एक अभिनेत्री आहे. सदर महिला बिहारची राजधानी कालीघाटच्या काली मंदिराच्या पायऱ्यांवर भीक मागून आपले पोट भरत आहे. त्यांना लोक मॅडम म्हणून म्हणायचे. एकेकाळी त्या कालीच्या मंदिरात हार्मोनियमवर गाणं म्हणायचा मात्र आज त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. पौर्णिमा देवी यांचे लग्न 1974 मध्ये बाराबंकीचे प्रसिद्ध वैद्य डॉ. एच.पी.. यांच्याशी झाले .या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्य झाले. नंतर डॉ. दिवाकर यांची संपत्तीच्या वादातून हत्या करण्यात आली.

पतीच्या निधनांनंतर पौर्णिमा देवी सासर सोडून पाटण्याला आल्या आणि आपल्या मावशीकडे राहू लागल्या तिथे राहू त्यांनी संगीतची शिक्षा घेतली आणि रेडिओवर गाणे गाऊ लागल्या. त्यांनी आपल्या स्वबळावर मुलांना मोठं केलं.त्यांचा मुलगा देखील ऑर्केस्ट्रावर गाणे गायचा नंतर कालांतराने तो नैराश्याला बळी ठरला. आणि मानसिक दृष्टया कमकुवत झाला. नंतर मुलगी शिकून मुंबईला गेली आणि टीव्ही मालिकेत अभिनेत्री बनली.

पण कधीही परतली नाही. तिने आई आणि भावाची कधीही विचारपूस केली नाही. काही लोकांनी महिलेच्या मुलीला तिच्या आईची अवस्था सांगून तिला मदत करण्याचा आशयाने सांगितले असून मुलीने ओळख दाखवायला नकार दिला.पौर्णिमा देवीची अवस्था अत्यन्त दयनीय झाली असून त्यांना पाहून कोणाचेही डोळे पाणवतील.       
 
Edited by - Priya Dixit