सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जुलै 2023 (10:01 IST)

जवान : शाहरुख खानच्या पिक्चरची पहिली झलक, फॅन्स फिदा

jawan shahrukh
मैं कौन हूं
 
कौन नही
 
पता नही
 
मां को किया वादा हूं
 
या अधुरा इरादा हूं
 
मैं अच्छा हूं
 
बुरा हूं
 
पुण्य हूं
 
या फिर फिर पाप हूं
 
ये अपने आप से पुछना
 
क्योंकी मैं भी आप हूं
 
शाहरुख खानचा नवा चित्रपट 'जवान'चा प्रिव्ह्यू आलाय आणि त्यातल्या या काही ओळी.
 
या चित्रपटाची चर्चा त्याचा आधीचा हिट चित्रपट 'पठाण' पासूनच सुरू झालीये.
 
सोमवार, 10 जुलैला याचा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर आता सगळीकडे याचीच चर्चा होतेय.
 
लोक या चित्रपटाची कथा, स्क्रिप्ट, ऍक्शन यावर बोलताना दिसत आहेत.
 
हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर 9 तासाच्या आत याला दीड कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. ट्विटरवरही हा ट्रेंड होत होता.
 
शाहरुख खानच्या या ट्रेलरमध्ये भरपूर अॅक्शन दिसतेय. दक्षिणेतल्या चित्रपटांचे दिग्दर्शक असलेल्या एटली यांचा हा चित्रपट आहे. याची मांडणी दक्षिणेतल्या चित्रपटांसारखीच आहे.
 
'जवान' रेड चिलीज एंटरटेनमेंटची निर्मिती आहे. शाहरुखची पत्नी गौरी खान याची निर्माती आहे आणि गौरव वर्मा सहनिर्माता आहे.
 
आधी हा चित्रपट 2 जूनला रिलीज होणार होता, पण याची निर्मिती दीर्घकाळ चालल्याने आता उशिरा रिलीज होईल.
 
मोठ्या स्टार्सची मांदियाळी
या चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकांमध्ये आहेत.
 
याखेरीज दीपिका पादुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोगरा, सुनिल ग्रोव्हर आणि मुकेश छाब्रा या चित्रपटात दिसतील.
 
चित्रपट समीक्षक आणि व्यवसाय विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटलं, "प्रतीक्षा संपली."
 
"जवानची झलक पहा. मस्त वाटतोय. याचा प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर हा चित्रपट भारी वाटतोय. आता याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत."
 
संकु नावाच्या एका युजरने लिहिलं आहे की, "किंगने सोशल मीडियाचे सारे रेकॉर्ड तोडले आहेत."
 
तर रोनित नावाच्या युजरने या ट्रेलरचं कौतुक करताना म्हटलं की, "काय ट्रेलर आहे, हा मला फार आवडला आहे. एटलीचं काम मस्त आहे. त्यांना माहितेय की जेव्हा ते व्हिलनचा रोल करतात तेव्हा बेस्ट असतात."
 
फिल्म कंपॅनियनने या ट्रेलरमध्ये दिसणारे शाहरुख खानचे लूक पोस्ट करत लिहिलं, "कोणता शाहरुख तुमच्या मंडे मूडचं प्रतिनिधीत्व करतो?"
 
शाहरुखचे अनेक लुक्स
या चित्रपटात शाहरुखचे अनेक लुक्स दिसत आहेत.
 
कधी तो टकला आहे, कधी पोलिसाच्या वेशात, कधी सैन्य अधिकाऱ्याच्या वेशात. एक लूक 'रईस' चित्रपटात होता तसा मोठ्या केसांचाही आहे. एकूण शाहरुख यात 6 लूकमध्ये दिसला आहे.
jawan shahrukh
एका ठिकाणी शाहरुखने सैन्याचा गणवेश घातला आहे आणि निळा गणवेश घातलेले सैनिक त्याला सलामी देत आहेत असं दिसतंय.
 
'पठाण'पेक्षा हिट ठरणार हा चित्रपट
शाहरुखचा मागचा चित्रपट 'पठाण' ब्लॉकब्लस्टर ठरला होता. जेव्हापासून 'जवान' चा ट्रेलर आलाय, सोशल मीडियावर त्याने धुमाकूळ घातला आहे.
 
असं म्हटलं जातंय की 'जवान' पठाणपेक्षा पण जास्त हिट ठरेल आणि जास्त कमाई करेल. या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन 150 कोटींपेक्षा जास्त असेल असंही म्हटलं जातंय.