फेमस होणं सोपं पण...
गेली 25 वर्षे बॉलिवूडमध्ये आपलं एक स्थान टिकवून असलेली अभिनेत्री काजोल म्हणते की, सध्याच्या काळात फेमस होणं फारसं कठीण राहिलेलं नाही. मात्र फेमस होणं आणि स्टार होणं यात बरंच अंतर आहे. सध्या अनेक जण फेमस होताहेत. मात्र स्टारपद काही मोजक्या कलावंतांना लाभलं आहे. फेसम आणि स्टार हे शब्द आता समानार्थी शब्द राहिलेले नाहीत. एका जमान्यात तसं होतं; पण आता काळ बदललाय. फेमस अनेक जण होतात; पण स्टारपद काही मोजक्या जणांच्या नावाला चिकटतं,' असं काजोल म्हणते. काजोल आपला पती अभिनेता अजय देवगणच्या आगामी 'तानाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटात दिसणार आहे. 1992 मध्ये राहुल रवैल यांच्या 'बेखुदी'मधून बॉलिवूडध्ये प्रवेश करणार्या काजोलच्या नावावर 'बाजिगर', 'ये दिल्लगी', 'करण अर्जून', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' आणि 'कुछ कुछ होता है' यांसारखे हिट सिनेमे आहेत.