रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

मला स्टमक कॅन्सर असून तो आता थर्ड स्टेजला : कमाल खान

आपल्याला स्टमक कॅन्सर असून तो आता थर्ड स्टेजला आहे, अशी माहिती कमाल खानने ट्वीटरवरुन दिली आहे, ज्यासोबत एक प्रेस नोटही जोडण्यात आली आहे.
 
कमाल खान नेहमीच त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. दरम्यान, याविषयी केआरकेशी संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे त्याच्या प्रकृतीविषयी नेमकी माहिती सांगणं कठीण आहे. मात्र त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही प्रेस नोट शेअर करण्यात आली आहे. 
 
कमाल खानची प्रेस नोट
 
''मला पोटाचा कॅन्सर असून तो थर्ड स्टेजला असल्याची खात्री झाली आहे. मी केवळ एक ते दोन वर्षे अजून जगू शकतो, असं मला वाटतं. मी आता कुणाचा फोनही घेणार नाही आणि या जगातून लवकरच जाणार असल्याबद्दल कुणाला दुःखही व्यक्त करु देणार नाही. मला आता एका दिवसासाठीही कुणाची सहानुभूती नकोय. मला जे अजूनही शिव्या देतात, तिरस्कार करतात, त्यांचा मी आदर करतो. मी फक्त माझ्या दोन इच्छा आता पूर्ण होणार नाहीत, म्हणून नाराज आहे. एक म्हणजे मला निर्माता म्हणून ए ग्रेड सिनेमा प्रोड्यूस करायचा होता. दुसरं म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायचं होतं. मात्र या माझ्या दोन्ही इच्छा आता कायमस्वरुपी मरणार आहेत. उर्वरित वेळ मी आता कुटुंबासोबत घालणार आहे. लव्ह यू ऑल, तिरस्कार करा, किंवा प्रेम! केआरके''