गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 डिसेंबर 2024 (17:06 IST)

कुंडली भाग्यची अभिनेत्री श्रद्धा आर्या बनली जुळ्या मुलांची आई

कुंडली भाग्य मालिकाची  अभिनेत्री श्रद्धा आर्या हिने जुळ्या मुलांना जन्म दिला असून तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. अभिनेत्रीने एक मुलाला आणि एक मुलीला जन्म दिला आहे. तिच्या घरी दोन लहानग्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. 

ही गोड बातमी अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करून दिली आहे. तिने आपल्या मुलांची झलक आपल्या चाहत्यांना दाखवली आहे. 

अभिनेत्री श्रद्धा ने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून तिने दोन्ही मुलांना मांडीवर घेतले आहे. तिने सांगितले की एक मुलगा आणि एक मुलगी झाल्याने आमचे कुटुंब पूर्ण झाले आहे. आम्हाला दुप्पट आनंद झाला आहे. 
 
श्रद्धा आर्याने 29 नोव्हेंबर रोजी आपल्या अपत्यांना जन्म दिला ज्याची माहिती तिने तिच्या पोस्टसह चिन्हांकित केली. व्हिडीओ मध्ये तिच्या भोवती निळे आणि गुलाबी रंगाचे फुगे दिसत आहे. तिने मुलीला गुलाबी कपड्यात गुंडाळले आणि मुलाला निळ्या कपड्यात गुंडाळले आहे. ती आपल्या दोन्ही मुलांवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. 
तिच्या या पोस्टवर चाहते कॉमेंट्स देत आहे. तसेच तिच्या सेलिब्रिटी मित्रानी 
श्रद्धाने 2021 मध्ये नेव्ही ऑफिसर राहुल शर्मासोबत लग्न केले होते. लग्नाच्या 3 वर्षानंतर आनंदाने आता त्यांच्या घरात दुप्पट आनंद आला आहे.
Edited By - Priya Dixit