रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 नोव्हेंबर 2023 (12:53 IST)

Madhuri Dixit निवडणुकीच्या रिंगणात? या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची चर्चा

धकधक गर्ल म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करण्याची चर्चा होत आहे. सूत्रांप्रमाणे माधुरी काही काळापासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहे. तथापि त्यांनी अजून याबद्दल काहीही स्पष्ट केलेले नाही की निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्या कोणत्या पक्षाहून आपलं करिअर सुरु करतील. यापूर्वी माधुरी पुण्याहून निवडणूक लढत असल्याची चर्चा होती.
 
माधुरी मुंबईत बुधवारी झालेल्या भारत-न्यूजीलंड सेमीफायनल सामान्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये दिसली होती. या दरम्यान माधुरी अजित पवार यांच्यासोबत दिसली. सोबतच एनसीपी नेता प्रफुल्ल पटेल देखील होते. तर भाजप नेते आशीष शेलार देखील होते. अशात माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
 
माधुरी उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.