मनोज तिवारी बनले मुलीचे वडील, हॉस्पिटलमधून पत्नीसोबतचा फोटो शेअर करून बातमी दिली
भोजपुरी अभिनेता, गायक आणि राजकारणी मनोज तिवारी यांच्या घरी पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या घरी एका छोट्या गोंडस मुलीचा जन्म झाला आहे. खुद्द मनोज तिवारी यांनी ट्विट करून ही आनंदाची बातमी दिली आहे. रुग्णालयातून पत्नी सुरभीसोबतचा फोटो शेअर करत त्यांनी मुलीच्या जन्माची आनंदाची बातमी दिली. यानंतर सोशल मीडियावर लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत.
लक्ष्मीच्या सरस्वतीच्या आगमनाविषयी मनोज तिवारी यांनी ट्विट केले आणि लिहिले- "माझ्या घरी लक्ष्मीनंतर सरस्वतीचे आगमन झाले आहे, हे कळवताना अत्यंत आनंद होत आहे...आज घरात एका सुंदर मुलीचा जन्म झाला आहे.