गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘केसरी’या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

अक्षय कुमारने आगामी  ‘केसरी’ या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आहे. अक्षय कुमार याने स्वत: या सिनेमाचा पहिला लूक सोशल मीडिया शेअर केला आहे. हा लूक शेअर करताना अक्षय कुमारने लिहिले की, ‘मला हा फोटो तुमच्यासोबत शेअर करताना गर्व होत आहे. मी नव्या वर्षाची सुरूवात केसरीने करत आहे. हा माझा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. जो मी पूर्ण मेहनतीने करणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा हव्यात’.

अक्षय कुमारने या सिनेमाची घोषणा २०१७ मध्ये सुरू केली होती. हा सिनेमा आधी अक्षय कुमार, करण जोहर आणि सलमान खान एकत्र तयार करणार होते. हा सिनेमा बॅटल ऑफ सारागडी वर आधारित आहे.