1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (11:39 IST)

नागिन फेम पर्ल व्ही पुरीला अटक, बलात्काराच्या आरोपाखाली कारवाई

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता पर्ल व्ही पुरीला (Pearl V Puri) रात्री उशिरा अटक केली आहे. या अभिनेत्यावर बलात्कार आणि विनयभंगाचा आरोप आहे. रिपोर्ट्सनुसार एका महिलेने अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या महिलेने व तिच्या कुटुंबियांनी पर्ल व्ही पुरीविरोधात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी तिला 4 जून रोजी उशिरा अटक केली. सध्या हा अभिनेता पोलिसांच्या ताब्यात आहे. 
 
उल्लेखनीय आहे की , गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पर्ल व्ही पुरीच्या वडीलांचं निधन झाले. त्यावेळी अभिनेता आपल्या शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. काही दिवसांपूर्वी पर्लने एका शो दरम्यान सांगितले होते की वडिलांनी आपण अभिनेता व्हावे असे वाटत नव्हतं, म्हणून तो घरातून पळून गेला होता. त्याच्याकडे पैसे शिल्लक नव्हते आणि आपली भूक भागवण्यासाठी पाणी-पुरी खात होता. एकदा त्याने नऊ दिवस काहीही खाल्ले नव्हते.
 
वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर पर्ल व्हीने वर्ष 2013 मध्ये अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली. 2013 मध्ये टीव्ही सीरियल 'दिल की नजर से खूबसूरत' यातून त्याने डेब्यू केलं. तथापि, 'फिर भी ना माने बदतमीज दिल' यात त्याला लीड रोल म्हणून पहिला ब्रेक मिळाला.
 
यानंतर पर्ल व्ही पुरीने 'नागार्जुन एक योद्धा', 'बेपनाह प्यार', 'नागिन 3' आणि 'ब्रह्मराक्षस 2' अशा अनेक मालिकांमध्ये काम केले. हा अभिनेता बिग बॉस 12 आणि 13 मध्ये अतिथी म्हणून देखील दिसला आहे. याशिवाय पर्ल 'किचन चॅम्पियन 5' आणि 'खतरा खतरा खतरा' सारख्या रिअॅलिटी शोमध्येही दिसला. त्याचे काही संगीत व्हिडिओही आले आहेत.