गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 सप्टेंबर 2018 (12:11 IST)

नेहाने का लपवली गरोदरपणाची बातमी?

अभिनेत्री नेहा धुपिया आणि आणि अभिनेता अंगद बेदीने एका अत्यंत खासगी कार्यक्रमात लग्नगाठ बांधली. ही जोडी कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुपचूप विवाहबंधनात अडकल्याने बरीच चर्चेत होती. मुळात फार कमी लोकांना नेहा आणि अंगद यांच्या रिलेशनशिपविषयीसुद्धा ठाऊक होते. त्यामुळे त्यांच्या लग्नाचे वृत्त हे अनेकांनाच धक्का देऊन गेले. त्यातच घाईत लग्न नेहाच्या गरोदरपणामुळे आटपले का? असा प्रश्न उपस्थित केला गेला. नेहाने गरोदर असल्याचे गेल्याच महिन्यात सोशल मीडियावर जाहीर केले. सहा महिन्यांपर्यंत ही बातमी अंगद आणि नेहाने का लपवली यामागचे कारण आता स्वतःनेहाने स्पष्ट केले आहे. माझ्या गरोदरपणाची मी जाणीवपूर्वक बातमी  लपवली. लोकांची माझ्याबद्दलची वागणूक बदलेल की काय, मला काम मिळणे बंद होईल की, काय अशी भीती मला वाटत होती. सुरुवातीच्या सहा महिन्यांपर्यंत सुदैवाने माझे बेबी बम्प दिसले नाही. मला याचा फायदा झाला. मी जास्त उत्साही असल्याने या दरम्यान 'हेलिकॉप्टर ईला' आणि 'स्टाइल्ड बाय नेहा'चे शूटिंग संपवल्याचे, तिने सांगितले. सोशल मीडियावर गरोदरपणाची बाती जाहीर केल्यानंतर नेहा आणि अंगदने 'लॅक्मे फॅशन वीक 2018' मध्ये एकत्र रॅम्पवॉक केला होता.