आशुतोष गोवारीकरच्या 'पानीपत' चे पोस्टर प्रदर्शित
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर 'पानीपत' हा एक नवीन ऐतिहासिक सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला.
लगान, जोधा अकबर, स्वदेस यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शक आशुतोष आता पानिपत सिनेमावर आधारित सिनेमा घेऊन येत आहेत. यात संजय दत्त, अर्जुन कपूर, कृति सेनन हे कलाकार आहेत. हे पोस्टर शेअर करत आशुतोष यांनी लिहिले की, इतिहासातील कथा मला नेहमीच आकर्षित करतात. यंदा ही कथा पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची आहे. हे आहे पहिले पोस्टर आहे. हा सिनेमा ६ डिसेंबर २०१९ मध्ये प्रदर्शित होईल.
अर्जुन कपूरचा हा पहिला ऐतिहासिक सिनेमा असेल. यात तो एका मराठा योद्धाच्या भूमिकेत दिसणार आहे.