शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (15:28 IST)

पोर्नोग्राफी प्रकरण: राज कुंद्रा यांना मोठा झटका, जामीन याचिका फेटाळली

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना पोलिसांनी अश्लील चित्रपट बनवून अ‍ॅपवर अपलोड केल्याबद्दल अटक केली आहे.मंगळवारी कोर्टाने राज कुंद्रा यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले. यानंतर राज कुंद्रा आणि रेयान थार्प यांनी मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
 
आता बातमी येत आहे की राज कुंद्रा यांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे. राज कुंद्रा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारपर्यंत तहकूब केली.या व्यतिरिक्त कोर्टाने सुनावणी दरम्यान या प्रकरणातील तपास अधिकारीही हजर राहायला हवे, असे म्हटले आहे.
 
राज कुंद्रा 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत होते.मुंबई पोलिसांनी राज यांच्यासाठी आणखी 7 दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती.परंतु पोलिसांची ही विनंती कोर्टाने मान्य केली नाही.कोर्टाने राज यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले.
 
राज कुंद्राची पहिली वैद्यकीय तपासणी जेजे रुग्णालयात झाली.त्यानंतर त्याला आर्थर रोड जेलमध्ये पाठविण्यात आले.राजविरोधातील खटला अधिक ठोस होण्यासाठी पोलिस सातत्याने पुरावे गोळा करीत आहेत.राज पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे बोलले जात आहे.