बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 29 सप्टेंबर 2024 (16:49 IST)

'Mrs Chatterjee vs Norway' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकल्यावर राणी मुखर्जीची प्रतिक्रिया

rani mukharejee
मी माझा IIFA पुरस्कार सर्व मातांना समर्पित करते!’ : 'Mrs Chatterjee vs Norway' साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकल्यावर राणी मुखर्जीची प्रतिक्रिया
 
बॉलिवूडची सुपरस्टार राणी मुखर्जी, ज्यांना ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटात त्यांच्या हृदयस्पर्शी अभिनयासाठी खूप कौतुक मिळालं, त्यांनी IIFA मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. राणीचा हा चित्रपट पॅंडेमिकनंतरचा पहिला कंटेंट-आधारित चित्रपट होता, ज्याने थिएटरमध्ये यश मिळवले आणि संपूर्ण इंडस्ट्रीला पुन्हा आत्मविश्वास दिला की उत्तम कंटेंट असलेले चित्रपट थिएटरमध्ये चालतातच.
 
पुरस्कार स्वीकारताना राणी मुखर्जी म्हणाल्या, "येथे उभं राहून, इतक्या अद्भुत आणि प्रेमळ प्रेक्षकांसमोर आणि माझ्या सहकलाकारांसमोर बेस्ट अ‍ॅक्टर पुरस्कार मिळवणे खूपच खास आहे. हा माझ्या करिअरमधील सर्वात खास चित्रपटांपैकी एक आहे. IIFA मध्ये हा पुरस्कार मिळणं अधिक खास आहे कारण यामुळे सिद्ध होतं की 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' ने जागतिक स्तरावर लोकांच्या मनावर ठसा उमटवला. या चित्रपटाच्या यशाने कथा सांगण्याचं अमरत्व आणि मातृत्वाच्या प्रेमाची व मानवी जिद्दीची सार्वत्रिक भाषा याची ताकद सिद्ध केली आहे."
 
त्या पुढे म्हणाल्या, "या भारतीय स्थलांतरित आईची कथा माझं मन उभं सोललं... एका आईचं तिच्या मुलावर असलेलं प्रेम निःस्वार्थ असतं. निःस्वार्थ प्रेम हा एक मिथक आहे असं मला वाटायचं, पण माझं स्वत:चं मूल झाल्यावर मी ते अनुभवले. आईचं प्रेम कोणताही कायदा मानत नाही आणि ती कोणावरही दया दाखवत नाही. ती सर्व गोष्टींचा सामना करू शकते आणि तिच्या मुलाच्या मार्गातील कोणतीही अडचण पार करू शकते. कोणत्याही परिस्थितीत तिच्या आणि तिच्या मुलाच्या मध्ये कोणी येऊ शकत नाही. या पुरस्काराचं समर्पण सर्व मातांना करताना मला खूप आनंद होत आहे. आई तिच्या मुलांसाठी पर्वत हलवू शकते आणि जगाला एक चांगलं ठिकाण बनवू शकते.”
 
राणी यांनी त्यांच्या चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले, ज्यांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहिला आणि 'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे' सारख्या दुर्मीळ चित्रपटाला पाठिंबा दिला.
 
त्या म्हणाल्या, "माझ्या चाहत्यांचे मनःपूर्वक आभार—तुमचं निःस्वार्थ प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मला मिळालेल्या प्रत्येक भूमिकेला, प्रत्येक कथेला स्वीकारलं आहे, ज्यांना मी जिवंत करण्याचं भाग्य मिळवलं आहे. तुमचा माझ्यावर असलेला विश्वास मला आणखी मेहनत करण्यास प्रवृत्त करतो. आजचा हा क्षण तुमच्या प्रार्थनांमुळे शक्य झाला आहे. तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिलात, त्यासाठी धन्यवाद. जेव्हा सर्व काही निराशाजनक वाटत होतं, तेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन 'मिसेस चॅटर्जी' ला संधी दिली. आजचा हा सन्मान मी तुमच्यासोबत शेअर करते!”