1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2024 (09:31 IST)

‘डॉन ३’ चा लूक चाहत्यांपासून लपवला

मुंबई : फरहान अख्तरच्या ‘डॉन ‘या चित्रपटाचा पुढिल भाग लवकरच येत आहे. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यानंतर आता बॉलिवूड इंडस्ट्रीला नवा डॉन मिळणार आहे. याआधी शाहरुख खान ‘डॉन ३’ चा भाग असेल असे बोलले जात होते, मात्र त्याने या चित्रपटातून माघार घेतली आहे. आता निर्मात्यांनी रणवीर सिंगला डॉनची भूमिका दिली आहे.
 
या चित्रपटात रणवीरसोबत अभिनेत्री कियारा अडवाणीही मुख्य भूमिकेत असणार आहे. या दोन्ही कलाकारांच्या नावांना डॉनच्या निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केली आहे. यांदरम्यान रणवीर सिंग विमानतळावर स्पॉट झाला आहे, जिथे त्याच्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. रणवीर ‘डॉन ‘३ चा लूक चाहत्यांपासून लपवत असल्याचा दावा केला जात आहे.
 
वास्तविक, काल रात्री रणवीर सिंग मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता. यावेळी त्याच्या लूकने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. नेहमीप्रमाणे रणवीर विमानतळावर त्याच्या अनोख्या लूकमध्ये दिसला. अभिनेत्याने काळ्या रंगाचा ओव्हरकोट आणि डोक्यावर टोपी घातली होती. या सगळ्यामध्ये रणवीरच्या मेस मास्कने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्याने पापाराझीला निश्चितपणे काही सेकंद दिले, परंतु त्याने त्याच्या चेह-यावरून मास्क काढला नाही. याच कारणामुळे रणवीरने ‘डॉन ३’ चा लूक चाहत्यांपासून आणि पापाराझींपासून लपवला असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे.
 
Edited by Ratnadeep Ranshoor