गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘सरकार 3’ येत्या 7 एप्रिलला प्रदर्शित होणार

‘सरकार’ या सिरीजमधील ‘सरकार ३’ हा तिसरा चित्रपट  प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. अमिताभ बच्चन हे या चित्रपटातही सुभाष नागरेच्या (सरकार) मुख्य भूमिकेत दिसतील. या चित्रपटातील त्यांच्या लूकने आधीच चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

अभिनेता मनोज बाजपेईची देखील यात प्रभावी भूमिका असून अभिनेत्री यामी गौतम अगदी साध्या भूमिकेत दिसणार आहे. आधीच्या चित्रपटांप्रमाणे यामी यात ग्लॅमरस रुपात दिसणार नाही. ती यात अन्नू करकरे ही व्यक्तिरेखा साकारत आहे. रोनीत रॉय हा पराग त्यागीची भूमिका साकारत असून अमित सध हा शिवाजी (चिकू) नागरेच्या भूमिकेत दिसेल.

भरत दाभोळकर यात गोरख रामपूरच्या भूमिकेत तर रोहिणी हट्टंगडी या रुक्कू बाई देवीच्या भूमिकेत दिसतील. राम गोपाल दिग्दर्शित ‘सरकार ३’ हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होईल.