सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (11:32 IST)

अभिनेत्रींच्या मानधनासाठी सरसावला शाहरूख

इंडस्ट्रीत प्रत्येक चित्रपटानुसार आणि त्या-त्या कलाकारानुसार मानधन मिळते. अभिनेते आणि अभिनेत्री यांना मिळणार्‍या मानधनाचा विषय नेहमीच चर्चेचा असतो. आता मानधनातील तफावतीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. अनेक अभिनेत्रींनी याबाबत आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त केलीय. सुपरस्टार शाहरुख खाननंही आपलं मत मांडलं असून दोघांना मिळणारं मानधन समानच असलं पाहिजे, असं तो म्हणाला. अभिनेत्रींनाही अभिनेत्यांइतकेच पैसे का मिळत नाहीत, असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे. किंग खानच्या या स्पष्ट वक्तेपणामुळे इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आनंद व्यक्त करत आहेत. दरम्यान, शाहरूख एका जाहिरातीमुळे चर्चेत आहे. शाहरुख खान एका बाथसोपच्या जाहिरातीत बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींसोबत दिसणार आहे. 
 
एक फोटोदेखील त्याने आपल्या टि्‌वटरवर पोस्ट केला आहे. फोटोत किंग खान करिश्मा, करिना, शर्मिला टॅगोर सोबत दिसत आहे. हा फोटो शेअर करत असताना त्याने कॅप्शन लिहिलंय की, इन एलिगेंट लेडीज सोबत स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव आठवणीत राहील.