बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 17 फेब्रुवारी 2019 (00:16 IST)

अखेर 'बागी-3'च्या मुख्य नायिकेचा शोध संपला

'बागी' आणि 'बागी 2' चित्रपटांना मिळालेल्या भरघोस यशानंतर अभिनेता टायगर श्रॉफच्या या चित्रपटाचा आता तिसरा भाग तुमच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. या तिसर्‍या भागात देखील टायगर श्रॉफ हाच मुख्य भूमिकेत झळकणार आहे. निर्माते मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटातील मुख्य नायिकेच्या शोधात फिरत होते. पण त्यांचा हा शोध आता संपला आहे. कारण या चित्रपटातील मुख्य नायिकेच्या नावाची घोषणा निर्मात्यांनाकडून करण्यात आली आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर या चित्रपटात सुरुवातील दिशा पटानी झळकणार असल्याच्या बातम्या आल्या आहे. त्यानंतर सारा अली खानच्या नावाची चर्चादेखील काही दिवस झाली. पण साराने आपल्याला या चित्रपटात महत्त्वाची भूकिा नसल्याचे सांगत हा चित्रपट नाकारला. त्यानंतर आता ही भूमिका कोण साकारणार याची चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु होती. त्याला आता पूर्णविराम लावण्यात आला आहे. या चित्रपटात झळकणार्‍या मुख्य नायिकेच्या नावाची अधिकृत माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी ट्विट केल्यानुसार या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्यभूमिकेत दिसणार आहे. श्रद्धाने याआधी बागीच्या पहिल्या भागात काम केले होते. टायगर श्रॉफची जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांची वाहवाही मिळाली होती. त्यामुळे रसिक प्रेक्षक त्याच्या आगामी तिसर्‍या भागाला कसा प्रतिसाद देणार हे येणारा काळच सांगेल. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करण्यात आले आहे. 'बागी 3' चे निर्माते साजिद नाडियादवाला आहेत, तर अहमद खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट 6 मार्च 2020 ला प्रदर्शित होणार आहे.