शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (13:48 IST)

Singer Raju Punjabi passed away : गायक राजू पंजाबी यांचे वयाच्या 40 व्या वर्षी निधन

raju paunjabi
social media
Singer Raju Punjabi passed away : हरियाणाचे प्रसिद्ध गायक राजू पंजाबी यांनी वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. देसी देसी ना बोला कर, सॉलिड बॉडी, तू चीज लाजवाब या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या राजू पंजाबी यांच्या आकस्मिक निधनाने त्यांचे कुटुंब पूर्णपणे कोसळले आहे. प्रसिद्ध गायकाचे आज पहाटे 4 वाजता निधन झाले. वृत्तानुसार, राजू पंजाबी यांची प्रकृती खालावल्याने हिसार येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.राजू पंजाबी यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिने सृष्टी जगात शोककळा पसरली आहे. राजू यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे.
 
राजू पंजाबी हे हरियाणातील हिसार येथील एका खाजगी रुग्णालयात काविळीवर बऱ्याच दिवसांपासून उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांच्या तब्येतीतही सुधारणा झाली आणि त्यांना घरी सोडण्यात आले, मात्र अचानक प्रकृती बिघडल्याने 40 वर्षीय गायक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
राजू पंजाबी यांच्या पार्थिवावर त्यांच्या रावतसर गावातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
हरियाणाचे प्रसिद्ध गायक राजू पंजाबी यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली. देसी-देसी, सॉलिड बॉडी, तू चीज लाजवाब, चंदन ही त्यांची गाणी खूप प्रसिद्ध आहेत. राजू पंजाबीने हरियाणाची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉसच्या माजी स्पर्धक सपना चौधरी  सोबत अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत.
त्यांच्या देसी-देसी ना बोलया कार या गाण्याने त्यांना उत्तर भारतातही लोकप्रिय केले. राजू पंजाबीचे शेवटचे गाणे 'आपसे मिलके यारा हमको अच्छा लगा था' 12 ऑगस्ट रोजी रिलीज झाले.
 







 Edited by - Priya Dixit