रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 30 एप्रिल 2018 (21:49 IST)

सोनमच्या लग्नासाठी खास ई-कार्डच्या माध्यमातून आमंत्रण

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा मित्र आनंद अहुजा यांच्या लग्नाची लगबग जोरात सुरु आहे.  सोनम तिच्या लग्नाला येणाऱ्या पाहुणेमंडळीना विशेष निमंत्रण पत्रिका देणार आहे.

लग्नपत्रिका न छापता ती इको फ्रेंडली पद्धतीने खास ई-कार्डच्या माध्यमातून खास आमंत्रण देणार आहे. गेटवर धक्काबुक्की होऊ नये तसेच सुरक्षेच्या दृष्टीने तिने ई-कार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या ई-कार्डवर पाहुण्यांच्या नावाचा वॉटरमार्क असेल त्यामुळे ते कार्ड लग्नसोहळा आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी दाखवणे महत्वाचे असणार आहे. सोनमची ई-कार्ड संकल्पना थोडी वेगळी असल्याने त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
 

मे महिन्याच्या ७ किंवा ८ मे रोजी सोनम लग्नबंधनात अडकणार आहे. सोनमच्या लग्नासाठी बॉलिवूड कलाकारांसह काही खास पाहुणेमंडळी उपस्थित राहणार आहेत. सध्या सोनमच्या लग्नपत्रिकेवरून अनेक चर्चा सुरू आहेत. मात्र सोनमने लग्नपत्रिका न छापण्याचा निर्णय घेतला आहे.