या फोटोद्वारे सनीने तिच्या मुलांची नावं ही सर्वांना सांगितली. सनीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘२१ जून २०१७ या दिवशी मला कळलं की अगदी थोड्या काळात मी तीन मुलांची आई होणार आहे. आम्ही मुलांचा विचार करायला सुरूवात केली आणि संसाराच्या एवढ्या वर्षांनंतर आता माझं कुटुंब अशर सिंग वेबर, नोहा सिंग वेबर आणि निशा कौर वेबरमुळे पूर्ण झालं आहे. काही आठवड्यांपूर्वी माझ्या मुलांचा जन्म झाला असला तरी गेल्या कित्येक वर्षांपासून ते आमच्याच हृदयात होते. देवाच्या कृपेने मला एक मोठं कुटुंब मिळालं आणि मला आणि डॅनियलला सुंदर अशी तीन मुलं आहेत.’