बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 18 मार्च 2020 (13:05 IST)

तापसीच्या झोळीत पडला आणखी एक स्पोर्टस्‌सिनेमा, पोस्टर आऊट

तापसी पन्नू लवकरच आणखी स्पोर्टस्‌ विषयाशी संबंधित सिनेमात दिसणार आहे. आरएसवीपीनिर्मित 'रश्मी रॉकेट' या चित्रपटाच्या शूटिंगला 26 मार्चपासून मुंबईमध्ये सुरुवात होणार आहे. तापसी यात रश्मीची भूमिका साकारणार आहे. जी वेगवान धावण्याची शक्ती असलेली कच्छच्या वाळवंटातली तरुणी आहे. 'सूरमा' आणि 'सांड की आंख'नंतर हा तिचा तिसरा स्पोर्टस्‌ जॉनरचा सिनेमा आहे. या व्यतिरिक्त तापसी 'शाबाश मिठू'मध्ये देखील दिसणार आहे, जो क्रिकेटर मिताली राजवर आधारित चित्रपट आहे. 
 
दोन महिन्यांपासूनच तापसीने आपल्या भूमिकेसाठी तयारी सुरु केली होती. तापसीने आपल्या आगामी रोमांस थ्रिलर 'हसीन दिलरुबा'च्या सेटवर रश्मीचसाठीचे प्रशिक्षण सुरु केले होते. 'रश्मी रॉकेट'चे दिग्दर्शक आकर्ष खुराणा म्हणाले की, या चित्रपटाचे शूटिंग आम्ही तीन भागात करणार आहोत. कच्छनंतर आम्ही मे महिन्यात दिल्ली आणि जूनमध्ये डेहराडून नंतर मसुरीमध्ये शूटिंग करणार आहोत. कच्छचे वाळवंट आमच्या शूटिंग कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग असणार आहे. इथल्या पहिल्या शेड्यूलची सुरुवात एका गाणने होते जो कच्छमधल्या एका उत्सवाचा भाग आहे.