गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 16 मार्च 2018 (11:58 IST)

अनुरागने तापसीला सेटवरून बाहेर काढले

अभिनेत्री तापसी पन्नू गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'मनमर्जिंयां'च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. पण आता दिग्दर्शक अनुराग कश्यपने तापसीला सेटच्या बाहेर काढले होते. हे आम्ही नाही तर तापसीची इन्स्टाग्राची पोस्टच सांगते. तापसी सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती अनेकदा सेटवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळीही तिने इन्स्टाग्रावर एक फोटो शेअर केला. यात ती आणि अनुराग दिसत आहेत. फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, 'जेव्हा दिग्दर्शक तुम्हाला सेटच्या बाहेर काढतो.' या फोटोत तापसीने निळ्या रंगाचा कुर्ता आणि हिरव्या रंगाचा पायजा घातला आहे. ती बसलेली असताना अनुराग तिला जाण्याचा इशारा करताना दिसत आहे. अनुराग कश्पही ही सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. त्यानेही तापसीसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये तो तापसीच्या मांडीत बसलेला दिसत आहे. अनुरागच्या या फोटोला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. 'मनमर्जिंयां' सिनेमातून अनुराग आणि तापसी पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. तर अनुरागचा विक्ती कौशलसोबतचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी दोघांनी राघव 2.0 मध्ये एकत्र काम केले होते. या सिनेमात अभिषेक बच्चनचीही मुख्य भूमिका आहे. आनंद एल रायने या सिनेमाची निर्मिती केली आहे.