गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जून 2018 (15:39 IST)

सर्वाधिक मानधन रम्याला

साऊथ सिनेमाचा सुपरहिट सिनेमा 'बाहुबली'. या सिनेमात काम करणार्‍या सगळ्या कलाकारांना आज जगभरात एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. हा सिनेमा हिट झाल्यानंतर या सिनेमांत काम करणार्‍या सगळ्या कलाकारांच्या मानधनात वाढ झाली आहे. यामध्ये अभिनेत्री रम्या कृष्णनचादेखील समावेश आहे. रम्याने 'बाहुबली 1', 'बाहुबली 2' या दोन्ही सिनेमांत अगदी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 'शिवगामी देवी'च्या रुपात दिसलेल्या रम्याला प्रेक्षकांनी भरपूर पसंत केलं आहे. साऊथच्या टॉप अभिनेत्रीमध्ये रम्याचा समावेश झाला आहे. रम्या आता अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि राकुल प्रीतपेक्षा अधिक मानधन आकारत आहे. एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, रम्या आता तेलुगू सिनेमा 'सैलाजा रेड्डी अल्लुदु' यामध्ये काम करत आहे. महत्त्वाचं म्हणजे एका दिवसाच्या शूटिंगचे ती 6 लाख रुपये मानधन घेत आहे. या सिनेमाकरता ती 25 दिवस शूटिंग करत असून 25 दिवसांचे 1.50 करोड रुपये आकारणार आहे. आतापर्यंत साऊथ अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक चार्ज रम्या आकारत असल्याचं म्हटलं जातं आहे. साऊथ अभिनेत्री तमन्ना भाटिया आतापर्यंत सिनेमांकरता 65 लाख रुपये आकारत आहे. तर अभिनेत्री राकुल प्रीत एका सिनोकरता 1करोड रुपये मानधन घेते. मात्र रम्या जास्त मानधन आकारत असून तिच्याकडे आता 'सैलाजा रेड्डी अल्लुदु' सोबतच 'सुपर डीलक्स' आणि 'पार्टी' सारखे सिनेमे आहेत. प्रारंभी रम्याने कन्नड चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमावले. उपेंद्रसारख्या सुपरस्टार अभिनेतबरोबर तिने काम केले. सुरुवातीला कन्नडमध्ये तिचा जम बसला नाही. नंतर मात्र तिचे कन्नड चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.