सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018 (11:48 IST)

'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' ने प्रेक्षकांचा अपेक्षाभंग केला

महानायक अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' ने प्रेक्षकांचा अपेक्षाभंग केला आहे. समिक्षकांना देखील हा सिनेमा फारसा रुचलेला दिसत नाही. असं असताना देखील रिलीजच्या पहिल्या दिवशीच सिनेमाने 4 नवे रेकॉर्ड केले आहेत. या चित्रपटाचे पहिल्या दोन दिवसांचे शो हाऊसफुल झालेत. सोबतच चार दिवसांचा मोठा वीकेंड असल्यामुळे हा चित्रपट वीकेंडपर्यंत २०० कोटी कमावण्याची शक्यता आहे.
वेगवेगळ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्टनुसार, या सिनेमाची 2 लाखाहून अधिक अॅडव्हान्स बुकींग झाली. यामुळे आमिर खानचा 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' भारतातील आजपर्यंतच्या सर्वाधिक अॅडव्हान्स बुकिंग झालेला सिनेमा ठरलाय. या सिनेमाचे सॅटेलाईट आणि डिजीटल राईट्स रिलीज आधीच 150 कोटीहून अधिक किंमतीत विकले गेले आहेत. 240 कोटी बजेट असलेल्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' सिनेमा जगभरात 7 हजारहून अधिक स्क्रिन्सवर रिलीज केला गेला. याआधी बाहुबली सिनेमा 6 हजार 500 स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला होता. 240 कोटी बजेट असलेला हा यशराजचा सिनेमा भारतातील सर्वात महागडा हिंदी सिनेमा ठरलाय. याआधी पद्मावत 210 कोटींमध्ये बनला होता.