शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (11:55 IST)

CDS बिपिन रावत यांना सिनेसृष्टीतून श्रद्धांजली

CDS जनरल बिपिन रावत यांचा तामिळनाडूमधील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. बिपीन रावत यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. दरम्यान, बॉलिवूडमध्येही त्यांच्या निधनावर अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.
 
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहिली, "सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि आणखी 11 लष्करी अधिकाऱ्यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. जनरल रावत यांना अनेकवेळा भेटण्याचे भाग्य लाभले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात विलक्षण धाडसीपणा आणि देशाबद्दल अतुलनीय प्रेम होते. त्यांच्याशी हातमिळवणी केल्यानंतर हृदयातून आणि तोंडातून आपोआप जय हिंद निघत असे. जय हिंद.