या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अल्लू अर्जुन त्याच्या पुष्पा 2 चित्रपटाचा प्रीमियर हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये करणार होता. अशा परिस्थितीत आपल्या आवडत्या स्टारला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी थिएटरबाहेर पोहोचली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. अल्लू अर्जुन त्याच्या चाहत्यांच्या गर्दीला भेटण्यासाठी सर्वात शेवटी पोहोचला. अभिनेत्याला पाहण्यासाठी लोक धावले, त्यामुळे तेथे चेंगराचेंगरी झाली. हैदराबादमधून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लोकांच्या जमावाने अल्लूच्या कारला घेराव घातला होता.#WATCH | Telangana: Actor Allu Arjun arrives at Sandhya theatre in Hyderabad for the premiere show of his film 'Pushpa 2: The Rule'. pic.twitter.com/Pkzra7Y1ja
— ANI (@ANI) December 4, 2024