बुधवार, 9 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी पुस्तक परिचय
Written By वेबदुनिया|

किशोर कुळकर्णी लिखित 'घडवा सुंदर हस्ताक्षर'

PR
पुस्तका शाळकरी विद्यार्थ्यांचे अक्षर दुरुस्तीस व्यापक रुप - आ. सुरेशदादा जैन

जळगाव - किशोर कुळकर्णी लिखित घडवा सुंदर हस्ताक्षर या पुस्तकामुळे शेकडो शाळकरी मुलांचे अक्षर दुरुस्त झाले असतील परंतु आता या पुस्तकामुळे या कार्यास व्यापक रुप येईल असे मत व्यक्त केले आ. सुरेशदादा जैन यांनी. येथील प. पू. प्रीतिसुधाजी म.सा. यांच्या मधुस्मिताजी म.सा. यांच्या पावन सान्निध्यात सुरु असलेल्या चातुर्मास महोत्सवात प.पू. मधुस्मिताजी म.सा. यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने विविध कार्यक्रम आयोजण्यात आले होते त्यात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कविवर्य ना.धों. मनोहर, संघपती दलुभाऊ जैन, महापौर प्रदीप रायसोनी, स्वरूपचंदजी कोठारी, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन आणि सौ. आरती कुळकर्णी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

तरुणभारत, गांवकरीमध्ये उपसंपादक म्हणून यशस्वी कार्य करून गेल्या दहा वर्षांपासून जैन इरिगेशनमध्ये प्रसिद्धी विभागात कार्यरत किशोर कुळकर्णी यांनी आपल्या जबाबदार्‍या पार पाडून गेल्या 14 वर्षांपासून खानदेशच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध शिक्षण संस्थात सुंदर हस्ताक्षराबद्दल मार्गदर्शन केले आहे. सुंदर हस्ताक्षराबद्दल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन तसेच कार्यशाळा या उपक्रमांमुळे शेकडों शालेय विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यास मदत झाली आहे. विद्यार्ध्यांनी वेळ व्यर्थ न घालविता सुंदर हस्ताक्षरांकडे, त्यांच्या सरावाकडे लक्ष दिल्यास त्यांचे अक्षर सुधारण्यास मदत तर होणारच आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी या चांगल्या गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे संघपती दलुभाऊ जैन यांनी सांगितले.

या प्रकाशन सोहळ्या शहरातीलच नव्हे तर पुणे, नाशिक, मालेगाव, नाशिकरोड येथील श्रावक संघ आणि संघपती तसेच साहित्यप्रेमी मोठ्‍या संख्येने उपस्थित होते.