बुधवार, 9 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: गुरूवार, 28 एप्रिल 2016 (17:21 IST)

पुस्तक परिचय - नवे जगणे

व्यक्तिमत्व विकासाचे एक सर्वोत्तम पुस्तक     
 
आज एक अनोख्या पद्धतीचे लिखाण वाचायला मिळाले खूप छान वाटले. ब-याच दिवसात असा विषय नाही वाचला. कवितासागर प्रकाशनचे संस्थापक डॉ. सुनिल दादा पाटील यांनी लेखक संदीप शेडबाळे यांनी लिहिलेले नवे जगणे हे पुस्तक वाचण्यासाठी मला दिले. एकदा वाचायला घेतले आणि त्या पुस्तकामध्येच रमून गेलो, पुस्तक केव्हा वाचून संपले समजलेच नाही. खुप नवनवीन विषया बरोबरच प्रत्येक व्यक्तीला आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडणारे असे हे पुस्तक आहे. प्रत्येकाचे आयुष्य हे सरळमागी असावे असे सर्वाना वाटते परंतु काही वाईट सवयी, संगती बरोबर असल्याने आयुष्याचे गणितच चूकते.
 
आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती अशा असतात की, त्यांना एखादे काम सांगितले तर त्या व्यक्ती कामाला सुरूवात करण्या अगोदर ते काम कशा पद्धतीने पूर्ण होणार नाही हे सांगण्यात रस दाखवतात. स्वतः जवळ जे काही आहे ते त्याचा पूरेपूर उपयोग केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. फक्त स्वत:वर आत्मविश्वास असायला हवा. लेखक संदीप शेडबाळे यांना अनेक छोट्याछोट्या घटकांमधून खूप मोठा अर्थ सांगितला आहे. कोणतेही काम जर मनापासून केले तर त्याची निर्णय क्षमता वाढीस मदत होते. ज्यांची निर्णय क्षमता उत्तम असते अशा व्यक्ती कोणतीही जबाबदारी घेण्यासाठी सदैव तयार असतात. प्रत्येक व्यक्तीने समाजामध्ये आजच्या स्पर्धेच्या काळात तुम्ही कोणालाही एक प्रश्न विचारा आणि त्याची वेगवेगळी उत्तरे तुमच्या समोर येतील. प्रश्न साधा सोपा आणि सरळ आहे. आपली आवडती व्यक्ती कोण? असा प्रश्न कोणालाही केलात तर उतरामध्ये अनेक व्यक्तींच्या नावांची रांग समोर उभी राहील. परंतु माणसाला स्वतःला किंवा स्वतः विषयी कितपत आवड आहे हे ठामपणे सांगता येत नाही. विद्यार्थी वर्गामध्ये तर स्वतःला किती मार्कस् पडले आहेत यापेक्षा आपल्या मागे आणि पुढे परीक्षेसाठी असणाया विद्याथ्याला किती मार्कस् मिळाले हे सर्वात प्रथम पाहिले जाते. हे का आणि कधी घडते याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक झाले आहे. आपका हर सपना सच हो सकता है, अगर आप उसे पाने की हिम्मत रखते है. या वाक्याप्रमाणे स्वतःशी तुलना इतरांशी करण्यापेक्षा स्वतः ची स्पर्धा स्वत:शी जेव्हा केली जाईल तेव्हा प्रत्येक व्यक्ती यशाच्या खूप उंच शिखरापर्यंत वावरत असताना सन्मानपूर्वक कसे वागावे, त्याच बरोबर वेळेचे बहुमोल महत्व, बोलून विचार करण्यापेक्षा, अनुभव एक सर्वश्रेष्ठ शिक्षक, नव्याने सुरूवात करताना, स्वतःकडून झालेल्या चूकांपासून धडा घ्यायला हवा, कोणत्याही वेळी प्रत्येक मानवाने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवावे ते म्हणजे, आळस हा प्रगतीच्या मार्गातील गतिरोधक आहे. या गतिरोधकाला व्यवस्थित समजावून घेवून त्यावर कशा पद्धतीने मात करावी हे लेखक संदीप शेडबाळे यांनी खूपच कमीत कमी शब्दांमध्ये उत्तमोत्तम अर्थ सांगितले आहेत. नवे जगणे हे पुस्तक वाचताना प्रत्येकाने स्वतः चे आत्मपरिक्षण केल्यासारखे वाटल्याशिवाय राहणार नाही. लेखक संदीप आप्पासो शेडबाळे आणि कवितासागर प्रकाशनाचे प्रकाशक डॉ. सुनिल पाटील यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...