शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (14:49 IST)

ऑनलाईन शिकताना ही काळजी घ्या

मागील वर्षी जवळ-जवळ प्रत्येक जण घरी बसूनच ऑनलाईन शिकत आहे किंवा एखादे काम करत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळ-जवळ संपूर्ण जगच ऑनलाइनच्या मार्गावर आहे. कोरोनामुळे शाळा आणि शिकवणीचे वर्ग देखील ऑनलाईन सुरू झाले आहेत.तरुण देखील आज ऑनलाईन शिकण्याने वाचले नाही. जर आपण देखील ऑनलाईन शिक्षण घेत आहात तर त्यासाठी काही खास गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आज आम्ही काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण ऑनलाईन शिक्षण प्रभावी करू शकता. चला जाणून घेऊ या.
 
* विषयाची ओळख करा -
ऑनलाईन शिकवणी घेण्यापूर्वी ज्या विषयाचा अभ्यास करावयाचा आहे त्या विषयी नेट वर सर्च करा. आपल्या मित्रांना विचारा की ऑनलाईन शिक्षण या विषयात करू शकतो किंवा नाही. जेव्हा आपण तयार असाल तेव्हाच त्या विषयाची शिकवणी घेण्यासाठी ऑनलाईन जा.
 
* फसवे ऑफर टाळा- 
कोरोनाच्या विषाणूंमुळे ऑनलाईन कोर्स मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशा मध्ये बऱ्याच संस्था ऑनलाईन शिकवणी घेण्यासाठी मुलांना भुरळ घालून आकर्षक ऑफर देतात. अशा परिस्थितीत आपण संपूर्ण माहिती मिळविल्यानंतरच ऑनलाईन शिकवणी वर्गात प्रवेश घ्या. इंटरनेटवर त्या संस्थेची माहिती मिळविल्यानंतरच प्रवेश घ्या.
 
* खाजगी आणि वैयक्तिक माहिती देणे टाळा-
आजकाल बरेच ऑनलाईन वर्ग ऑनलाईन शिकवणीसाठी विविध प्रकारच्या वैयक्तिक माहिती विचारतात, अशा परिस्थितीत आपण खाजगी माहिती देणे टाळावे. जसे की अकाउंट्स किंवा खात्याची माहिती, पासवर्ड इत्यादी कोणासह सामायिक करू नये. विशेषतः ऑनलाईन शिकवणीच्या दरम्यान.
 
* तुलना करा- 
आपण ज्या ऑनलाईन शिकवणीच्या वर्गात प्रवेश घेण्याचा विचार करीत आहात, त्याची तुलना इतर संस्थेशी करावी. हे माहिती घ्यावी की कोणती संस्था चांगली आहे आणि कोणती नाही. या शिवाय घेतल्या जाणाऱ्या फीस ची तुलना देखील करावी की कोणती संस्था आपल्याला कमी पैसे घेऊन चांगली शिकवणी देऊ शकते आणि कोणती नाही.