रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Updated : गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (08:40 IST)

Best Career Tips चांगले करियर बनविण्यासाठी या 10 गोष्टी लक्षात ठेवा

career
आपण चांगले करियर बनवू इच्छिता तर पुस्तकी ज्ञानाशिवाय देखील काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचे आहे.पुस्तकी ज्ञान आपल्याला चांगले करियर मिळवून देऊ शकतो परंतु जीवन जगण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहे जे आपल्या जीवनाला अधिक उत्कृष्ट बनवतील आणि या मुळे आपल्याला कधीही काहीच अडचणी येणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या 10 अशा गोष्टी ज्या चांगले करियर बनवायला मदत करतात.
 
1 आपली प्रतिभा शोधा - पुस्तकी ज्ञानाने आजच्या काळात काहीच होत नसत .चांगले करियर बनविण्यासाठी आपल्या आतील प्रतिभा शोधून काढा आणि तज्ञांकडून सल्ला घेऊन त्या क्षेत्रात उत्तम करियर बनवा.
 
2 आत्मविश्वास असणे महत्त्वाचे आहे- आपल्या कडे आत्मविश्वास असेल तर काहीही करू शकतो. आत्मविश्वासाच्याबळावर जीवनात कोणतेही युद्ध जिंकता येतात. अभ्यासासह अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हा जे आपला आत्मविश्वास वाढवतील.
 
3 संपर्क वाढवा- आपले सम्पर्क लोकांशी जेवढे ठेवाल आपले आयुष्य सोपं होईल.आपले सर्वोत्तम संपर्क आपल्याला कारकीर्दीची चांगली संधी देऊ शकतात. म्हणून, जास्तीत जास्त लोकांना भेटत रहा आणि त्यांना स्वतःची माहिती द्या आणि त्यांच्या कडून माहिती घ्या. 
 
4 टेक्नो फ्रेंडली व्हा- चांगल्या करिअरसाठी टेक्नो फ्रेंडली होणे महत्वाचे आहे. आज स्पर्धा इतकी वाढली आहे की नवीन तंत्रज्ञान नाकारता येत नाही. आपल्या फील्डशी संबंधित तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान ठेवा. यासह, ते नवीन तंत्रज्ञान देखील शिकत राहा.
 
5 कुटुंबाला महत्त्व द्या- बहुतेक वेळा लोक करियरच्या कारणास्तव घर आणि कुटुंबापासून दूर जातात. परंतु जर आपल्याला वास्तविक आनंद पाहिजे असेल तर आपल्याला कुटुंबाचे महत्त्व समजून घ्यावे लागेल. कारकीर्दीतील चढउतार आणि ताणतणावाच्या वेळी आपले कुटुंब आपली मदत करतात म्हणून कुटुंबाशी जुडून राहा.
 
6 आपली वागणूक चांगली छाप सोडते - आपले व्यवहारच आपली चांगली किंवा वाईट छवी बनवतात. म्हणून नेहमी दुसऱ्यांशी चांगला व्यवहार करा. आपली चांगली वागणूकच यशाचे मार्ग उघडते. म्हणून दुसऱ्यांशी नेहमी चांगला व्यवहार करा.   
 
7 स्वतःशी प्रामाणिक राहा- खोटारडेपणा जास्त काळ टिकत नाही. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहा. लोकांसमोर आपली खरी प्रतिमा ठेवा बनावटी नको.कामाच्या प्रति नेहमी प्रामाणिक राहा. या मुळे आपण प्रगती कराल.
 
8 अति महत्वाकांक्षी होऊ नका - अधिक महत्वाकांक्षी असणे आपल्यासाठी हानिकारक असू शकते. जरी प्रत्येक मानवासाठी महत्त्वाकांक्षी असणे आवश्यक आहे. परंतु अति महत्त्वाकांक्षी होणे देखील आपल्यासाठी नुकसानदायी होऊ शकत.
 
9 स्वतःला अपडेट ठेवा- काळानुसार स्वतःला अपडेट ठेवा. करियरच्या बाजारपेठेत आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी सवतःला अपडेट ठेवा.
 
10 आपल्यासह प्लॅन 'बी ' ठेवा- बऱ्याच वेळा असे होते की आपण करियर मध्ये घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात. अशा वेळी आपल्यासह प्लॅन 'बी' ठेवा म्हणजे एक योजना अयशस्वी झाली की लगेच दुसरी वापरता येईल. असं केल्याने आपल्याला अपयश येण्याची शक्यता कमी होईल.