मंगळवार, 29 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (07:54 IST)

राज्यात २ हजार ५८५ नवे कोरोनाबाधीत दाखल

राज्यात रविवारी २ हजार ५८५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढ झाली असून ४० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख २६ हजार ३९९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५१ हजार ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १ हजार ६७० रुग्ण बरे होऊ घरी परतले असून आजपर्यंत एकूण १९ लाख २९ हजार ५ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१९ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२ टक्के एवढा आहे.
 
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४६ लाख १७ हजार १६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख २६ हजार ३९९ (१३.८६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९० हजार २३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार २९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या राज्यात एकूण ४५ हजार ७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.