कोरोना लॉकडाऊनः 1 जूनला महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार की संपणार?

uddhav thackare
Last Modified शुक्रवार, 21 मे 2021 (21:03 IST)
राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली आहे. राज्यात लॉकडाऊन घोषित केल्यानेच या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची राज्य सरकारची भूमिका आहे.
दरम्यान, मे महिन्यातील 21 दिवस लॉकडाऊनमध्ये घालवल्यानंतर अखेरच्या टप्प्यात पुन्हा लॉकडाऊनबाबत चर्चा होऊ लागली आहे.

सध्या राज्यात 16 मे ते 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत 15 दिवसांचं लॉकडाऊन लागू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार की संपणार हा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे.

रुग्णसंख्येत घट
गुरुवारी (20 मे) राज्यात 29 हजार 911 रुग्ण आढळून आले. गेल्या महिन्यात 60-65 हजारांच्या आसपास पोहोचलेली दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या टप्प्याटप्प्याने खाली येत आता 30 हजारांपेक्षाही खाली आली.
सध्या सुरू असलेलं लॉकडाऊन आणखी 9 दिवस लागू असेल. त्यामुळे पुढील काही दिवसांत रुग्णसंख्या आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
मात्र, तरीही राज्य सरकारने याबाबत अत्यंत सावध भूमिका घेतल्याचं दिसून येतं. पुढील दोन-तीन महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनावर मिळवलेलं नियंत्रण कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सुटू न देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
राज्यात ही चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री आणि राज्य सरकारमधील इतर मंत्र्यांकडून सावध प्रतिक्रिया येत असल्याचं दिसून येतं.
शुक्रवारी सकाळी तौक्ते पाहणी दौऱ्यानिमित्त रायगडमध्ये दाखल झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊन संदर्भात प्रश्न विचारण्यात आले.

या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

"कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या कमी होत आहे, हे नक्कीच. पण त्यासंदर्भात आताच काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्या वेळी आपण याचा अनुभव घेतला आहे. गेल्यावेळीही कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोव्हिड चौपटीने वाढला," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
"कोरोना व्हायरस घातक असून आपण निर्बंध शिथील करताना अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सध्या परिस्थिती आटोक्यात आहे, मात्र सर्व बाबींचा विचार करूनच लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्यात येईल," असंही ठाकरे यांनी म्हटलं.

तज्त्रांच्या मते, उद्धव ठाकरे यांची वरील प्रतिक्रिया म्हणजे लॉकडाऊन वाढवला जाण्याचे संकेत आहेत. रुग्णसंख्या कमी होत असल्याने राज्य सरकारचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारीही घेतली जाणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लॉकडाऊन संदर्भात आज प्रतिक्रिया दिली.
सध्याचं लॉकडाऊन संपायला अजून 10 दिवस अवकाश आहे. या 10 दिवसांत काय घडतं ते आधी बघू, त्यानंतरच लॉकडाऊन वाढवायचं की उठवायचं याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं स्पष्ट मत पवार यांनी नोंदवलं.

ही बातमी तुम्हाला खालील लिंकवर क्लिक करून वाचता येईल.

10 दिवसांत काय होतं ते पाहून लॉकडाऊनचा निर्णय घेऊ - अजित पवार

दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही CNBC टीव्हीला एक मुलाखत दिली होती.
आदित्य ठाकरे यांच्या मते, लॉकडाऊन वाढवला जाणार किंवा नाही, हे पूर्णपणे राज्यातील करोना रुग्णसंख्येवर अवलंबून असेल. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तेव्हाच्या स्थितीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय सरकार घेईल.

सध्या नागरिकांच्या आरोग्यालाच पहिलं प्राधान्य असेल व त्यानुसारच पुढचा निर्णय होईल, राज्यात सध्या लॉकडाऊन असला तरी अर्थचक्र मात्र सुरू आहे. प्रमुख कार्यालये, उद्योगधंदे, आयात-निर्यात यावर कोणतीही बंधने घालण्यात आलेली नाहीत.
केवळ अनावश्यक गोष्टींसाठी जे घराबाहेर पडतात त्यांना अटकाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे अनावश्यक कारणासाठी घराबाहेर कधी जाता येणार, असा तुमचा प्रश्न असेल तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतरच, हे त्यावर उत्तर असल्याचे आदित्य म्हणाले आहेत.यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
अरबी समुद्र आणि तामिळनाडू किनारपट्टी परिसरात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र ...

New Covid-19 Guidelines : राज्य सरकारची नवी नियमावली

New Covid-19 Guidelines : राज्य सरकारची नवी नियमावली
महाराष्ट्र सरकारने आज नव्याने निर्बंधांची नियमावली जाहीर केली आहे

गुजरात भीषण अपघात: कच्छच्या आखातात दोन मोठी जहाजे आदळली,..

गुजरात भीषण अपघात: कच्छच्या आखातात दोन मोठी जहाजे आदळली,..
कच्छच्या खाडीत शुक्रवारी रात्री दोन जहाजांची टक्कर झाली. संरक्षण मंत्रालयाच्या ...

ओमीक्रॉन वेरिएंट विचारमंथन: PM मोदी यांनी आंतरराष्ट्रीय ...

ओमीक्रॉन वेरिएंट विचारमंथन: PM मोदी यांनी आंतरराष्ट्रीय प्रवासाचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले
कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन वेरिएंटच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

सोयाबीनचे भाव वाढूनही शेतकरी खूश नाहीत, जाणून घ्या संपूर्ण ...

सोयाबीनचे भाव वाढूनही शेतकरी खूश नाहीत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
सोयाबीनची आवक कमी होत असल्याने मागणी वाढत आहे. शनिवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार ...