मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified शुक्रवार, 5 जून 2020 (22:28 IST)

करोनाचा फैलाव अद्यापही नियंत्रणा बाहेर, ४ दिवसांत ९११ जणांचे मृत्यू

भारतामध्ये कोरोनाबाधित  रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.  गेल्या चार दिवसांत ९११ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 
 
करोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर १००० जणांच्या मृत्यूची नोंद होण्यासाठी ४८ दिवस लागले होते. तिथे ही संख्या गेल्या चार दिवसांत पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरुनच ही बाब समोर आली आहे. यावरुन भारतात करोनाचा फैलाव अद्यापही नियंत्रणात नसल्याचं समोर येत आहे.
 
करोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजारांवर पोहोचण्यासाठी ८७ दिवस लागले होते. २६ एप्रिलला भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या २५ हजार होती. पण यामध्ये वेगाने वाढ होत असून फक्त सहा आठवड्यात रुग्णसंख्या २ लाख २६ हजार ७७० वर पोहोचली आहे.
 
भारतात १२ मार्च रोजी पहिल्या करोना रुग्णाची नोंद झाली होती. २९ एप्रिल रोजी भारतात मृतांची संख्या एक हजारावर पोहोचली होती. पण काही आठड्यातच ही संख्या ६०७५ इतकी झाली आहे. ४ जूनपर्यंतची आकडेवारी पाहता फक्त गेल्या चार दिवसांत ९०० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.