मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (23:44 IST)

Corona Update : महाराष्ट्रासह 7 राज्यात कोरोनाचा वेग वाढला

देशातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णवाढीवर केंद्र सरकारने धोक्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र ओडीशा, तामिळनाडू आणि तेलंगणा यांच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहून या राज्यांमध्ये साप्ताहीक रुग्णवाढीचा दर 10 टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे चिंता व्यक्त केली आहे.
 
केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले की कोरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी पात्र असलेल्या लोकांच्या लसीकरणाची गती वाढविण्याचे आणि कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. येत्या काळात सणानिमित्त लोक एकत्र येणार आणि पुन्हा या संसर्गजन्य आजाराचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. सध्या देशात गेल्या 24 तासांत भारतात 19 हजार 406  नवीन कोरोना रुग्ण आढळून आले असून 49 मृत्यूंची नोंद झाली आहे. एकूण संक्रमणांपैकी 0.31 टक्के सक्रीय प्रकरणे आहेत, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.50  टक्के आहे.खबरदारी म्हणून लोकांनी मास्कचा वापर करावा आणि गर्दीत जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.