शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: वर्धा , सोमवार, 4 मे 2020 (10:09 IST)

आई वडिलांसारखी आमची काळजी घेतली : वर्धेतून निघताना कामगारांनी व्यक्त केल्या भावना

लॉकडाऊन नंतर रोजगार गेल्यामुळे आम्ही इकडे तिकडे भटकत होतो. वर्धेत आल्यावर येथील लोकांनी आमची आई-वडिलांप्रमाणे काळजी घेतली. केवळ आमच्या जेवणाचाच प्रश्न यांनी सोडवला नाही तर कपडे, चप्पल, इत्यादी साहित्यासोबतच परतीच्या प्रवासाचे तिकीट आणि प्रावासात जेवणाचे डबेही दिलेत अशी भावनिक प्रतिक्रिया राम मनोहर वर्मा या कामगाराने  व्यक्त केली.

लखनऊला जाणारी रेल्वे गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 6 वाजता सुटली. यामध्ये वर्धा जिल्ह्यात अडकलेल्या 220 कामगारांना आज विशेष बसगाड्यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचवण्यात आले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधिक्षक बसवराज तेली, मुख्य कार्याकारी अधिकारी सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, डॉ सचिन पावडे, प्रदीप बजाज  यांनी नवजीवन छात्रावास येथे कामगारांना निरोप दिला. यावेळी काही कामगारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

या जिल्ह्याचा पाहुणचार घेऊन आम्ही जात आाहोत आाणि हा पाहुणचार आमच्या कायम लक्षात राहील. या जिल्ह्याची ही खासियत आम्ही आमच्या घरच्यांनाही सांगू असे श्री वर्मा यांनी सांगितले.