suvichar

Expert Advice : प्रत्येक सर्दी -पडसं कोविड - 19 नाही, घाबरू नका, रोगाला ओळखा.....

Updated: शनिवार, 11 जुलै 2020 (15:43 IST)
 
साधारणपणे दर वर्षी हवामानातील बदलावमुळेच काही लोकांना सर्दी-पडसं होत, जे काहीवेळा वाढल्यामुळे दम्याचं रूप घेतं. त्याच बरोबर फ्लू किंवा इन्फ्लुएंझा देखील एका प्रकारच्या व्हायरस ने पसरणारा आजार आहे, जे या हंगामात एकमेकांना पसरतो. संयम ठेवून हे समजणे गरजेचे आहे की कोणाला कोणते लक्षणं आहेत?
खाली तालिकेमध्ये सांगितलेल्या लक्षणांच्या आधारे आपण हे निर्णय घेऊ शकतो आणि गरज असल्यास शासनाने अधिकृत केलेल्या फ्लू चिकित्सालयात आपली तपासणी आणि औषधोपचार करवू शकता.
इथे हे जाणून घेणे गरजेचे आहे की कोविड -19 किंवा कोरोनाचा संसर्ग कोणा संसर्गी माणसाच्या संपर्कात आल्यावरच होऊ शकतो.
काही लोकं वेळ आणि हवामानाच्या बदलण्यामुळे सर्दी-पडसं आणि ऍलर्जी किंवा दम्याचे बळी ठरतात. अश्या लोकांना कोविड -19 च्या संसर्ग असणाऱ्या पासून दूर राहावं.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोविड 19 मध्ये रुग्ण जवळ जवळ 15 %टक्के गंभीर अवस्थेत आणि 5 % टक्के खूपच अत्यावस्थेत जाऊ शकतात.
कोविड 19 च्या रुग्णांचे फ्लूच्या रुग्णाच्या तुलनेत अत्यंत गंभीर आणि अंत्यावस्थेत पोहोचण्याचा धोका जास्त असतो. कोविड- 19 ची मृत्यूदर देखील फ्लूच्या तुलनेत जास्त आहे. 
 
या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन घराच्या बाहेर पडताना या सर्व गोष्टींना पाळणे बंधनकारक आहे.
* प्रत्येका पासून किमान 6 फूट किंवा 2 मीटरचे सामाजिक अंतर ठेवावं.
* मास्कचा वापर करून नाक आणि तोंड झाकून ठेवा.
* हातांना साबण किंवा चांगल्या सेनेटाईझर ने स्वच्छ करावं.
* चेहऱ्याला हात लावू नये.
* अस्वस्थता जाणवत असल्यास घरातच राहा.
* शक्य असल्यास, घरातूनच काम करा.
* वर्दळीच्या जागी जाण्यास टाळावं.
* वेळीच योग्य तपासणी आणि औषधोपचार घ्या आणि नियमांना काटेकोर पाळा.
* ज्यांना आधीपासूनच मधुमेह, श्वसनाचे आजार, कर्करोग, मूत्रपिंडाचे आजारा सारखे इतर गंभीर आजार असल्यास, त्यांना खूपच सावधगिरी बाळगावी लागेल आणि वेळोवेळी आपल्या चिकित्सकांशी योग्य परामर्श घ्यावा.
* स्वस्थ राहण्यासाठी कुठलीही सावधगिरी उपचारांपेक्षा चांगली आहे.
सर्वे भवंतु सुखिन:,
सर्वे सन्तु निरामया:।

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

आयफोन 18 मध्ये महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळतील, कारण दोन्ही स्टँडर्ड आयफोन्समध्ये 18 महिन्यांचे अंतर असेल

इस्कॉनच्या गोविंदा रेस्टॉरंटचा परवाना निलंबित! तुकाराम मुंडे यांची कारवाई

नागपूर ते इंदूर प्रवास आता फक्त ६ तासांत; चार पदरी महामार्ग प्रकल्पाला मंजुरी

कर्जामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांची गळफास घेत आत्महत्या

LIVE: मराठवाड्यात ३.१६ लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

पुढील लेख