करोना व्हायरसमुळे भारतात चौथा मृत्यू
करोना व्हायरसमुळे भारतात चौथा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील एका 70 वर्षीय व्यक्तीचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. याआधी करोनामुळे तीन मृत्यू झाले आहेत.
पंजाबच्या होशियारपूरमधील बांगा येथील रुग्णालयात या व्यक्तीचे निधन झाले. छातीत दुखत असल्यामुळे या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा करोना व्हायरसच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही व्यक्ती इटलीमार्गे जर्मनीहून भारतात आली होती.
या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या व्यक्तीच्या गावापासूनचा तीन किमीपर्यंतचा परिसर बंद करण्यात आला आहे.
फाईल फोटो