गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified गुरूवार, 16 एप्रिल 2020 (22:37 IST)

55 देशांना भारत करणार ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा

करोनाने जगभरात थैमान घातले असून सर्वच देश या व्हायरसला लढा देत आहे. अशात भारत अनेक देशांना मदतीचा हात देत आहे. भारताने एक मोठा निर्णय घेत 55 देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करणार आहे. केंद्र सरकारने याबाबद मान्यता दिली आहे. 
 
याहून गर्वाची बाब काय असेल जेव्हा संपूर्ण जग करोनाला झुंज देत असताना भारत इतर देशांच्या मदतीसाठी धाव घेत आहे. सरकारने 55 देशांना ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’चा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मलादिव, श्रीलंका, म्यानमार, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सेशेल्स, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, डॉमनिकन रिपब्लिक, युगांडा, इजिप्त, सेनेगल, अल्जेरिया, जमैका, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, युक्रेन, नेदरलँड, स्लोवानिया, उरुग्वे, इक्वाडोर आणि अन्य देशांचा समावेश आहे.
 
यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाविरुद्ध लढ्यात भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधांचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. 
 
हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषधं करोना व्हायरसवरही प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे ज्यामुळे जगभरातून या औषधाला मोठया प्रमाणावर मागणी असल्याचं समोर आलं होतं. भारत सरकारने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र आता केंद्र सरकारने पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे.