Biodata Maker marathi
✕

डिसेंबरपर्यंत भारताला मिळणार करोनाची लस

Updated: मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (17:54 IST)
 
या वर्षाच्या अखेरिस भारतला आपली करोनाची लस मिळणार असल्याचा दावा सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केला आहे. 
 
सीएनबीसी टीव्ही १८ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की दोन महिन्यांत कंपनी लशीच्या किंमतीबाबत माहिती देणार आहे. पूनावाला असेही म्हणाले की, अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठासमवेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कोरोना व्हायरस लस तयार करीत आहे, ज्याचे टेस्ट रिझल्ट चांगले आले आहेत.
 
पूनावाला यांनी सांगितले की, आम्ही ICMR यांच्यासमवेत भारतातील हजारो रुग्णांवर या लसीची चाचणी करणार आहोत. त्यांना खात्री आहे की लशीची चाचणी यशस्वी होईल. 
 
सिरम ही संस्था, GAVI ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून करोना लसीसाठी १५० मिलियन डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे. सिरम इन्स्टिट्युट २०२१ पर्यंत १०० दशलक्ष डोस पुरवणार आहे. या लसीची जास्तीत जास्त किंमत ३ यूएस डॉलर्स म्हणजे साधारण २२५ ते २५० रुपयांपर्यंत असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटने दिली होती.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्यांची दहशत! ४ महिन्यांत ३५ वासरांचा बळी

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! उच्चांकी दरापासून चांदी ₹२.७१ लाखांनी, तर सोने ₹७२,००० ने स्वस्त

धक्कादायक! मोबाईल दिला नाही म्हणून पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळला; नाशिकमधील घटनेने खळबळ

महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट अधिक गडद; रब्बी पेरणीत मोठी घट होण्याची शक्यता; विरोधकांकडून सरकारवर टीका

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण

पुढील लेख
Show comments