बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मे 2020 (17:06 IST)

सिंगापूरमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी परतले

लॉकडाउनमुळे सिंगापूरमध्ये अडकलेले भारतीय अखेर मायदेशी परतले आहेत. एअर इंडियाच्या विशेष विमानाने त्यांना भारतात आणण्यात आले. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास एअर इंडियाच्या AI 381 विमानाने दिल्ली एअरपोर्टवर लँड केले. एकूण २३४ प्रवासी या विमानामध्ये होते. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी ही माहिती दिली.
 
परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या या मोहिमेला ‘वंदे भारत मिशन’ नाव देण्यात आले आहे. गुरुवारी रात्री १०.२०च्या सुमारास एअर इंडियाचे पहिले विमान अबू धाबीवरुन केरळच्या कोची विमानतळावर दाखल झाले. करोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन आहे. त्यामुळे जवळपास १५ हजार भारतीय वेगवेगळया देशांमध्ये अडकले आहेत. त्यांना विशेष विमानाने परत आणण्यात येणार आहे.