सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : मंगळवार, 5 मे 2020 (09:42 IST)

भारतीयांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया 7 मे पासून सुरू करण्यात येईल

परिस्थिती अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक भारतीय अन्य देशांमध्ये अडकले आहे. दरम्यान त्यांना टप्प्याटप्प्यानं मायदेशी आणण्याची प्रक्रिया ७ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणं नाहीत अशाच लोकांना परत आणण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तसंच त्यांना परत आणण्यासाठी विमानं तसंच नौदलाची मदत घेण्यात येणार आहे. परंतु प्रवासाचा खर्च मात्र संबंधित प्रवाशांनाच करावा लागणार आहे. भारतात परतल्यानंतर त्यांना १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावं लागणार आहे.
 
“परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यास सरकार त्यांची मदत करेल. आवश्यकता असल्यासच त्यांना भारतात परतण्याची परवानगी देण्यात येईल. तसंच ही प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं राबवण्यात येणार आहे. त्यांना विमान अथवा नौदलाच्या नौकांद्वारे भारतात आणसं जाईल, भारतीय दूतावास आणि उच्चायोगाला परदेशात अडकलेल्यांची एक यादी तयार करण्यास सांगण्यात आलं आहे, प्रवासाचा खर्च प्रवाशांनाच करावा लागणार आहे,” असं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.