गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 मे 2020 (22:36 IST)

घरी परत जायचं आहे, भरा ऑनलाईन, वाचा अशी आहे प्रक्रिया

लॉकडाऊनमुळे दुसऱ्या जिल्ह्यात अडकलेल्यांना राज्यातल्या आपल्या जिल्ह्यात आता जाता येणार आहे. यासाठी शासनाकडून काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. स्वत:च्या जिल्हयामध्ये परतण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. या अर्जासोबतच कागदपत्रांची माहितीही द्यावी लागणार आहे. ही सगळी प्रक्रिया ऑनलाईनच करायची असून यासाठी कोणत्याही कार्यालयात गर्दी न करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
 
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नसणार आहे. पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना देण्यात आले आहेत.
 
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी
https://forms.gle/xhBWCWS5JL8XaAncA
 
भारताच्या व महाराष्ट्राच्या विविध भागात अडकलेल्या व्यक्तींना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी परत येण्यासाठी परवानगी हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करुन आवश्यक माहिती भरावी...
 
https://forms.gle/QH64JkBy72h8tbhj7
 
ही माहिती भरल्यानंतर संबंधित जिल्हा/राज्य तील सक्षम प्राधिकारी यांच्याशी समन्वय साधून सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल.
 
रत्नागिरी
रत्नगिरीतून दुस-या जिल्हयात किंवा राज्यात जाणार असाल तर खालील लिंकवर आपली नोंदणी करावी.
 
https://forms.gle/g4yi1DHK5eijGphQ6
 
दुसरा राज्यातून किंवा जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्हयात येत असाल तर खालील    लिंकवर नोंदणी करावी.
 
https://forms.gle/PHc7wRCpe5tqe4cM6
 
रायगड
रायगड  जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी
 
https://forms.gle/fgEGNoGTxber4HRs5
 
भारताच्या व महाराष्ट्राच्या विविध भागात अडकलेल्या व्यक्तींना रायगड जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी परत येण्यासाठी परवानगी हवी असल्यास खालील लिंकवर क्लिक करुन आवश्यक माहिती भरावी...
 
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfOouvUI_w6sXNvmi7pxSoryj3e3d2b...
 
नांदेड
नांदेड जिल्ह्यातील Containment zone च्या बाहेर असणारे लोकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी. माहिती भरताना सोबत खालील कागदपत्रे Upload करावीत.
 
1)  नजीकच्या काळातील स्पष्ट फोटो, File Size 200 kb पर्यंत
 
2) नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (Registered Medical Practitioner) यांचे कुठल्याही फ्लू सदृश्य आजार नसल्याचे प्रमाणपत्र आपल्या पत्त्यासह किंवा आधारकार्ड File size 500 KB  पर्यंत
 
https://covid19.mhpolice.in/
 
नागपूर
nagpur.gov.in या संकेतस्थळ  यावर ऑन लाईन अर्ज विहित नमुन्यात  सादर करणे आवश्यक आहे
 
सातारा
साताऱ्यातून इतर राज्यात तसेच इतर जिल्ह्यात जाणाऱ्यांसाठी आणि साताऱ्यात इतर जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्यांनी या लिंक मध्ये जाऊन आपले नाव नोंदवायचे आहे.
 
https://bit.ly/2VTPn64
 
गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांसाठी लिंक 
 
https://gadchiroli.gov.in/information-of-citizens-willing-to-go-outside-...
 
बाहेरून गडचिरोली जिल्ह्यामध्ये येण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकसाठी लिंक
 
https://gadchiroli.gov.in/information-of-citizens-willing-to-come-to-gad...
 
उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्यांसाठी  https://forms.gle/zyuRtu1yMFBqGqQq6 या लिंक वर माहिती भरावी
 
उस्मानाबादमध्ये येण्याकरिता या https://forms.gle/Pt3tKxQwG9dmptyJ8 लिंकवर  माहिती भरावी.
 
ज्या व्यक्ती स्वत:च्या किंवा दुसऱ्याच्या खाजगी वाहनाने जाऊ शकतात त्यांच्यासाठी covid19.mhpolice.in या वेबसाईटवर माहिती भरणं गरजेचं आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला प्रवाशाचे नाव, वाहनाची माहिती, प्रवासाचा दिवस, कुठे जायचं आहे याची माहिती आणि प्रवासाचं कारण द्यावं लागणार आहे.