शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 28 एप्रिल 2020 (15:17 IST)

न्यूझीलंडचा हा दिग्गज एका महिन्यापासून भारतात अडकला होता, सुखरूप घरी परतल्यावर पंतप्रधान मोदींचे आभार

कोरोनाव्हायरस (Coronavirus) मुळे देशव्यापी लॉकडाऊन सुरू आहे आणि यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक माइक हेसन भारतात अडकले होते. पण येथे महिनाभर राहिल्यानंतर तो मंगळवारी न्यूझीलंडला परतला आहे. आयपीएलच्या नवीन हंगामासाठी न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू हेसन 5 मार्च रोजी भारतात आला होता, परंतु कोविड -19 साथीचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन आणि विमानसेवा न मिळाल्यामुळे तो येथे अडकले होता.