शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By

वुहान कोरोनामुक्त झाले, चीनच्या सरकारी मीडियाची माहिती

चीनमधील वुहान शहरातून कोरोना व्हायरस जगभर पसरला. आता वुहान कोरोनामुक्त झाले आहे. वुहानमधील कोरोनाचे शेवटचे तीन रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे वुहानमध्ये आता कोरोनाचा एकही रुग्ण नाही, असे चीनच्या सरकारी मीडियाने वृत्त दिले आहे.
 
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये  गुरुवारी पाच रुग्ण आढळून आले. यात शांघायमधील ४ आणि सिचुआन प्रांतातील एका रुग्णाचा समावेश आहे. मात्र, वुहानमध्ये आता एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही.
 
चीनमध्ये एकूण ८३,०२७ जणांना कोरोनाची बाधा झाली. यातील अद्याप ६६ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ७८,३२७ रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर चीनमध्ये ४,६३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.