राज्यात 67,752 जणांना डिस्चार्ज; 66,358 नवे रुग्ण
राज्यात मंगळवारी कोरोनाची दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. 67 हजार 752 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, 66 हजार 358 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात 895 रुग्ण दगावले आहेत.
आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 44 लाख 10 हजार 085 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 36 लाख 69 हजार 548 रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून, राज्याचा रिकव्हरी रेट 83.21 टक्के एवढा झाला आहे. सध्या राज्यात 6 लाख 72 हजार 434 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 895 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 66 हजार 179 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.50 टक्के एवढा आहे.
सध्या राज्यात 42 लाख 64 हजार 936 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 30 हजार 146 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 62 लाख 54 हजार 737 नमूने तपासण्यात आले आहेत.