मंगळवार, 21 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (16:32 IST)

आमदार माणिकराव कोकाटे यांना कोरोना

सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. कोकाटे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
 
दरम्यान, यापूर्वी आमदार सरोज अहिरे, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार नरेंद्र दराडे यांचे देखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांनी आता कोरोना संसर्गावर मात केली आहे. त्या पाठोपाठ आता कोकाटेंचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोकाटे यांना सौम्य लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेतील विश्वसनीय सूंत्रानी दिली आहे. सध्या त्यांना होम क्वारंटाइन राहण्यास सांगितले आहे.