गुरूवार, 30 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified बुधवार, 15 एप्रिल 2020 (17:37 IST)

हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस देण्यात येणार

मुंबईतील वरळी, लोअर परेल, धारावी, दादर ही ठिकाण कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत.आता वरळी आणि धारावी भागातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

वय वर्ष 18 ते 55 वयोगटातील निरोगी नागारिकांना हा डोस दिला जाणार आहे,” असेही महापौर म्हणाल्या.
“ज्या लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार यासारखे आजार नाही, त्यांना या गोळ्या दिल्या जाणार आहे. या दाट लोकसंख्येच्या भागातील गर्दी आणि संसर्गाची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हे औषध दिले जाणार आहे. धारावीतील 50 हजार आणि वरळीतील 50 हजार नागरिकांपैकी ज्यांना आजार नाही त्यांना आजपासून या गोळ्या दिल्या जाणार आहेत,” असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

“पुढील सात आठवडे हे औषधं देण्यात येणार आहे. पहिल्या आठवड्यात प्रत्येकी 2 गोळ्या आणि पुढील प्रत्येक आठवड्यात 1 गोळी देण्यात येणार आहे.”