Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिकचा कोरोना ग्राऊंड रिपोर्ट

Updated: बुधवार, 19 मे 2021 (16:42 IST)
 
तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ७ हजार ४७०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ३३६ तर जिल्ह्याबाहेरील २० असे एकूण १८ हजार १३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७२ हजार १३७रुग्ण आढळून आले आहेत.
 
*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी*जिल्हयातरुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिकग्रामीण मधे ९१.७७ टक्के, नाशिक शहरात ९५.७६ टक्के, मालेगावमध्ये ८६.६५ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.६६  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण९४.०२ इतके आहे.
 
*मृत्यु :*नाशिकग्रामीण १ हजार ९९२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ७५४ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २८५ व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार १३० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
 
*लक्षणीय :
◼️३ लाख ७२ हजार १३७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३लाख ४९ हजार ८७५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १८ हजार १३२ पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.०२ टक्के. 
 
नाशिकमहापालिकेच्या वेबसाईट वर बेडस उपलब्ध पण, प्रत्यक्षपरिस्थिती वेगळी
नाशिकमहापालिकेने शहरातील बेडची संख्या दाखवण्यासाठी एक पोर्टल तयार केलं आहे.रुग्णालयांना त्यावर माहिती अपडेट करायला सांगितली आहे. मात्र, रुग्णालयांकडून माहिती अपडेट केली जात नसल्याने वेबसाईटवर बेड रिकामे दाखवते आणि रुग्णालयात पोहोचल्यानंतर प्रत्यक्षात बेड उपलब्ध नसतो.

http://covidcbrs.nmc.gov.in/home/hospitalSummaryही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. यावेबसाईटवर बेड उपलब्ध असल्याबाबत माहिती मिळेल. पालिकेने 9607623366 / 9607432233 / 0253-2317292/ 7030300300 हेक्रमांक दिले आहेत. 
 
नाशिकमध्ये640 बेड वाढवण्यात येणार नाशिक जिल्हासामान्य रुग्णालयात पूर्वी 110खाटांची क्षमता होती. तेथे आता 90बेड वाढविल्याने 200 बेडची क्षमता झाली आहे. तसेच बिटकोरुग्णालयात 300, तसेच नाशिकरोड येथील अग्निशमन दलाचीइमारत व भक्तनिवास या कोविड केअर सेंटरमध्ये 250असे एकूण 640 अतिरिक्त बेडची वाढ करण्यात येणार आहे. 
 
नाशिकमध्ये कोरोना चाचणी कशी होते?
एखाद्याला लक्षणे असली किंवा तो कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला असेल आणि त्याला टेस्ट करायचीअसेल तर नाशिक विविध ठिकाणी कोरोना चाचणी केली जाते. नाशिकमध्ये टेस्ट करण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये वेगवेगळी केंद्र उघडली आहेत. त्या ठिकाणी RTPCR आणि अँटिजन टेस्ट केली जाते. सोबतच खाजगीरुग्णालय ज्यांना कोव्हिड रुग्णालय जाहीर केलं आहे, तिथे काही खाजगी लॅबमध्ये सुद्धा टेस्ट केली जाते.  
 
रेमडेसिव्हीरमिळतं का? त्यांचे दर, रुग्णालयांची फी वगैरे सगळं नाशिकमहापालिकेने या लिंकवर https://nmc.gov.in/article/index/id/172 रेमडेसिव्हीर इंजेक्शन कुठे मिळेलयाची माहिती उपलब्ध करुन दिली आहे. 
 
नाशिक महापालिकेने दिलेली ही माहिती त्यानुसार 79 कोव्हिड रुग्णालय, 34 मेडिकल्सकडील उपलब्ध साठ्याची माहिती दिलीआहे. तर, 10 रिटेल विक्रेत्यांची माहिती शेअर केलीआहे. सध्या नाशिकमध्ये रेमडेसिव्हीरचा तुटवडा भासत असून मेडिकलमध्ये रांगालागल्याचं चित्र पाहायला मिळालं. नाशिक जिल्हा प्रशासनानं नागपूरमधून रेमडेसिव्हीरऔषधं मागवली होती. 
 
टेस्टचारिपोर्ट येण्यासाठी किती वेळ लागतो? तोपर्यंत रुग्णाने काय करायचं?RTPCR टेस्टसाठी 1 ते 2तास लागतात. या चाचणीचा रिपोर्ट 24तासानंतर येतो. तर अँटिजन टेस्ट 20मिनिटात होते, आणि या चाचणीचा रिपोर्टही 1 ते 2तासात येतो. टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत रुग्णाला विलगीकरणात राहायचं असते. 
 
एखाद्याचारिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर रुग्णाने कुठे जायचं? महापालिकात्याला घेऊन जाते की स्वत:ला जावं लागतं. रुग्णाचाकोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एकतर रुग्णाला लक्षणे कमी असेल तरडॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विलगीकरणात राहता येते. लक्षणे जास्त असल्यासकोव्हिड केअर सेंटरला भरती करण्यात येते. सेंटरला रुग्ण स्वतः जाऊ शकतो किंवा माहिती दिल्यास महापालिका रुग्णवाहिका पाठविते. 
 
रुग्णांनाकुठे पाठवलं जातं?
कोव्हिडसेंटर किंवा तत्सम ज्यांनाखाजगी रुग्णालयात जायचं असेल ते तिकडे जाऊ शकतात किंवा मग कोव्हिड केअर सेंटरउभारले आहेत. नाशिकमध्ये रेमडेसिव्हीरसाठी रांगाकोरोनारुग्णांना देण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा मोठा तुटवडा नाशिकमध्ये निर्माण झाला. नाशिकजिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना रेमडिसिव्हर मिळत नसल्याने रुग्णांचेनातेवाईक चांगलेच हैराण झाले आहे. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

विद्यापीठांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

LIVE: विद्यापीठांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

नागपूरमध्ये बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून मैत्री करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

मुंबईतील घाटकोपरमध्ये भूस्खलनात ७ जणांचा मृत्यू, ७ जण जखमी

आयफोन १८ प्रो चा नवीन अवतार लीक, या रंगांमध्ये लॉन्च होऊ शकतो

पुढील लेख
Show comments